Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मंद्रूप येथील सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न...

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मंद्रूप येथील सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मंद्रूप येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा गीतांजली मसलखांब आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर सातवीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आणलेली भेट वस्तू शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्याकडे देण्यात आली.

याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका श्रीमती जयश्री मराठे यांनी विद्यार्थ्यांना भेट म्हणून पेन दिले. शेवटी शाळेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुरी भाजी, लाडू अशा विविध भाज्या आणि पदार्थांचे गोड जेवण देण्यात आले.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर माने, नारायण कांबळे, सागर कोळी, कल्पना कुंभार, सुनंदा कोळी, वर्षा कांबळे, सिद्धरामेश्वर माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी सुप्रिया कुंभार व संस्कृती पाटील यांनी केले तर आभार सुप्रिया कुंभार यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रमोद माने, कृष्णा गब्बुर, श्रीमती वंदना सलवदे आदिंनी परिश्रम घेतले.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820



हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments