Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आमदार प्रणिती शिंदे व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या भेटीमुळे एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यात उत्साह.

 आमदार प्रणिती शिंदे व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या भेटीमुळे एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यात उत्साह


 सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठोपाठ आता भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांनी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली.आता लोकसभेचे दोन्ही उमेदवार महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन दखल घेताच एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यात उत्साहा संचारला आहे.कारण महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्यामुळे जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क वाढला आहे.त्यातच महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भुमिका अजूनही जाहीर न केल्याने आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महादेव कोगनुरे यांची दखल घेताना दिसून येत आहेत.कारण गेल्या अनेक वर्षांपासून महादेव कोगनुरे यांनी एम के फाउंडेशन च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात नि:स्वार्थ भावनेने जनमानसांची सेवा करताना दिसतात.यामुळेच महादेव कोगनुरे यांना जनमानसांच्या ह्रदयात स्थान मिळताना दिसून येत आहे.यापुढे महादेव कोगनुरे यांनी ही राजकारणात राहून समाजकार्य करीत जनमानसांच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या पक्षाला साथ देण्याची भुमिका महादेव कोगनुरे घेणार असल्याचे बोलले जात आहे.यामुळेच सध्या विविध पक्षाचे नेते महादेव च्या संपर्कात येताना दिसतात.महायुती आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे दोन्ही ही उमेदवार आता महादेव कोगनुरे यांची भेट घेतल्याने आता महादेव कोगनुरे यांनी काय भुमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याची खिंड लढवण्यासाठी एम के फाउंडेशन ची सेना सध्या सज्ज झाल्याचे बोलले जात आहे.शांत,संयमी व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेले महादेव कोगनुरे यांचे नेतृत्व सध्या सर्वांना हवेहवेसे वाटत आहे.यामुळेच महादेव च्या राजकीय भुमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments