Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कंदलगावचे विद्यमान उपसरपंच चाँदबाशा सय्यद यांचा कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश; आमदार सुभाष देशमुख गटाला धक्का

कंदलगावचे विद्यमान उपसरपंच चाँदबाशा सय्यद यांचा कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश; आमदार सुभाष देशमुख गटाला धक्का

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच चाँदबाशा सय्यद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील जाई- जुई बंगल्यात माजी केद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे कंदलगावातील आमदार सुभाष देशमुख गटाला जबरदस्त धक्का मानला जात आहे. यासंदर्भात पंपू व्हनमाने आणि अमित नरुटे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावेळी कंदलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच चाँदबाशा सय्यद, विद्यमान ग्रा. प. सदस्य अमित नरुटे, ताज सोशल ग्रुपचे शाखा अध्यक्ष इमाम मुल्ला, वकील शेख, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हणमंत सलगरे, पंप्पू व्हनमाने, अभि व्हनमाने, राहुल उडानशिव, बिरु सलगरे, संगप्पा कोळी, लखन आयवळे, संजय सब्जे आदी उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...



बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments