मंद्रूप / दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नं. 161/2019 (सेशन केस नं. 277/2022) प्रकरणात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवार, दि. 22 डिसेंबर 2025 रोजी निकाल दिला.
हा खटला मा. श्री. जयदीप जे. मोहिते, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सोलापूर यांच्या न्यायासनासमोर चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे श्रीमती ॲड. एस. एस. क्यातम यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणात आरोपी
1) रमेश संगप्पा वाघमारे
2) प्रकाश संगप्पा वाघमारे
(दोघे रा. मड्डी वस्ती, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांना न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनुसार
भा.दं.वि. कलम 394 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ₹10,000 दंड, भा.दं.वि. कलम 353 अन्वये 1 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹5,000 दंड, भा.दं.वि. कलम 341 अन्वये 1 आठवडा साधी कैद किंवा ₹ 1,000 दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे (concurrently) भोगावयाच्या आहेत.
न्यायालयाने आरोपींना पूर्वी भोगलेल्या कोठडी कालावधीचा (Set-off – कलम 428 CrPC) लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात आरोपी
3) विजय बिरप्पा हजारे व 4) पुट्टालप्पा उर्फ भीमराव कांबळे यांची भा.दं.वि. 394, 353, 341, 504, 506 सह 34 अंतर्गत निर्दोष मुक्तता करण्यात आली असून त्यांना तत्काळ मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, जप्त केलेली MH-13/CZ-9750 क्रमांकाची दुचाकी मूळ मालकास परत देण्याचे, मोबाईल व डायरी ही मुद्देमाल फिर्यादीस परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास PSI गणेश पिंगूवाले यांनी केला.
मार्गदर्शन मा. संकेत देवळेकर (SDPO, सोलापूर) व मा. एपीआय मनोज पवार (प्रभारी अधिकारी, मंद्रूप पोलीस ठाणे) यांनी केले.
कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ग्रेड पीएसआय विजयकुमार जाधव, ग्रेड पीएसआय. प्रिया जाधव तर कोर्ट पैरवी कामकाज म.पो.कॉ. पुजा महादेव काळे यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडले.

0 Comments