सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज :
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे समक्ष निराकरण करण्यासाठी भव्य जनता दरबार – तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत समाधान व्यक्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. अतुल वि. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जनता दरबार पार पडला. यावेळी ग्रामीण भागातील तक्रारदारांच्या समस्या ऐकण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः उपस्थित होते.
या दरबारात नागरिकांच्या तक्रारी समोरासमोर ऐकून घेत तात्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी भापोसे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री. राहुल आत्राम, एसडीपीओ श्री. संकेत देवळेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार जागेवर उपस्थित राहून तक्रारींचे त्वरित वर्गीकरण व निराकरण करण्यात आले.
जनता दरबार दरम्यान एकूण ११५ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून, १४३ तक्रार अर्जांवर कारवाई करून निर्गती देण्यात आली. काही तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आल्या.
महिलांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी भरोसा सेल व महिला शाखा सक्रिय सहभागी झाली. कौटुंबिक वादातून सुमारे एक वर्षापासून विभक्त असलेल्या महिलेचे योग्य समुपदेशन करून तिला सासरी नांदण्यास पाठविण्यात आले. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
तक्रारदारांना कायदेशीर मार्गदर्शन मिळावे यासाठी अॅड. शिवकैलास झुरळे, उपमुख्य लोकअभिरक्षक, विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
हा जनता दरबार यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अर्ज शाखा, भरोसा सेल तसेच विविध अधिकारी व अंमलदारांनी मोलाचे योगदान दिले.
जनता दरबार यशस्वी पार पाडण्यासाठी योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी :
सदर जनता दरबार व तक्रार निवारण दिन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोसई श्री. उस्मान शेख, पो.कॉ. सचिन चव्हाण, मपोना ज्योती कोरे, मपो.कॉ. पुजा करडे, मपोना गंवडी, मपो.कॉ. कुर्ले, मपो.कॉ. विश्वकर्मा यांनी तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून तक्रारीच्या स्वरूपानुसार तात्काळ कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडे पाठपुरावा केला.
तसेच महिला तक्रारींच्या निराकरणासाठी महिला शाखा – भरोसा सेल कडील मपो.सई सुरेखा शिंदे, ए.एस.आय. कवचाळे, मपो.हे.कॉ. भोगे, मपो.हे.कॉ. चव्हाण, मपो.कॉ. मस्के, मपो.कॉ. शिंदे, मपो.कॉ. पवार हे पथक उपस्थित राहून महिलांच्या तक्रारींचे समुपदेशन व निराकरण करण्यात सक्रिय सहभागी होते.






0 Comments