Advertisement

Breaking News
Loading...

श्री सिद्धेश्वर यात्रेत यंदा ड्रोन शो आकर्षण असणार – देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष धर्मराज काडादी...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : सोलापूरच्या प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर यात्रेत यंदा भाविकांसाठी आधुनिकतेची जोड देण्यात येणार असून ड्रोन शो हे विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.


सोलापूरची ओळख असलेली आणि ‘गड्डा यात्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेली श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेत सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येच्या विवाहाची पौराणिक कथा साकारली जाते. तैलाभिषेक, होम, आरती, फटाकेबाजी तसेच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते.


यंदाच्या यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले की, परंपरा जपत भाविकांना नवे अनुभव देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ड्रोन शोद्वारे सिद्धेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचे व यात्रेचे महत्व आकाशात साकारले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापूरमध्ये दाखल होतात. भाविकांच्या सोयीसाठी सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्य सुविधा यावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने यात्रा शांततेत व भक्तिभावात पार पडावी यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधण्यात येत असून, भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहनही अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments