Advertisement

Breaking News
Loading...

“सोलापुरातील प्रत्येक घरापर्यंत रोज पिण्याचे पाणी पोहोचवणारच” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज :

सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सोलापूरकरांना ठाम शब्दांत आश्वासन दिले की, “सोलापुरातील प्रत्येक घरात दररोज पिण्याचे पाणी पोहोचविल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.” पाणी प्रश्न सोडवणे हे शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


या दौऱ्याच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी आरती करून राज्यातील व सोलापूर शहरातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि विकासासाठी प्रार्थना केली. सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.


या प्रसंगी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि नागरी सोयीसुविधांचा विकास गतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला.




Post a Comment

0 Comments