Advertisement

Breaking News
Loading...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलिसांची मोठी कारवाई; ₹1.34 लाखांची अवैध दारू जप्त...


मंद्रूप| हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंद्रूप पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹1,34,140/- किमतीची अवैध दारू व एक मोटारसायकल जप्त करत एका इसमास रंगेहात ताब्यात घेतले आहे.

माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण व अंमलदार अश्फाक मियावाले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान मोटारसायकलवरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

तत्काळ कारवाई करत पोलिसांनी संबंधित अवैध दारू व वाहन जप्त केले असून आरोपीविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मंद्रूप पोलिसांकडून देण्यात आला आहे.

नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन मंद्रूप पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण करीत आहेत.



Post a Comment

0 Comments