मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी आणि कडक कारवाई केली आहे. परिसरात अवैध धंदे व गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या तब्बल 18 आरोपींना तडीपार करण्याचे आदेश मा. अपर तहसीलदार, मंद्रूप यांनी दिले आहेत.

या निर्णायक कारवाईमुळे मंद्रूप व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसला असून, स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. निवडणुका निर्भय, निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध व समाजविघातक कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.