मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. 28 फेब्रुवारी 2026 :
मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या बेकायदेशीर देशी व विदेशी दारूच्या मोठ्या साठ्यावर आज कायदेशीररित्या हातोडा मारत तो पूर्णपणे नष्ट करण्यात आला. सुमारे ₹1,52,661 किमतीचा मुद्देमाल मा. न्यायालय, सोलापूर यांच्या आदेशानुसार पंचासमक्ष जमीनदोस्त करण्यात आला.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या सूचनेनुसार पार पडली.
कारवाईचा थरारक तपशील:
विविध गुन्हे क्रमांकांतील जप्त दारूचा साठा...
90 मि.ली., 180 मि.ली. व इतर क्षमतेच्या शेकडो बाटल्या...
हातभट्टी दारूचे हजारो लिटर प्रमाणात जप्ती...
नामांकित ब्रँड्सच्या विदेशी दारूचा मोठा साठा...
पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहा. फौजदार पाटील, म.पो.कॉ. कांबळे यांनी पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण मुद्देमाल पोलीस ठाणे परिसरालगत असलेल्या खड्ड्यात टाकून फोडून नष्ट केला. संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण करून अधिकृत नोंद ठेवण्यात आली आहे.
कायद्याला आव्हान देणाऱ्यांना कडक इशारा:
मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री, साठवणूक अथवा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे धडक कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
“दारूमाफियांनो सावधान… मंद्रूप पोलीस सज्ज आहेत!”
कायद्याचा धाक कायम ठेवत नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार मंद्रूप पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.


0 Comments