नरखेड | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर :
नरखेड जिल्हा परिषद गट क्रमांक २४ मधून अपक्ष उमेदवार श्री. अनिल आबाजी पाटील यांनी मतदारांना कळकळीचे आवाहन केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा गैरवापर होऊ देऊ नका, असे सांगत त्यांनी मतदारांनी सजग राहावे, असे मत व्यक्त केले.
शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आज काही राजकीय नेत्यांकडून मतदारांचा बाजार मांडला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदान म्हणजे मोठे दान असून तुमच्या मताची किंमत अमूल्य आहे. पैशांच्या आमिषाला बळी पडून मत मागणाऱ्या नेत्यांना मत देऊ नये, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
खऱ्या अर्थाने जनतेची कामे करणारा, स्वच्छ आणि प्रामाणिक नेता निवडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत, नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अपक्ष उमेदवार श्री. अनिल आबाजी पाटील यांना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी नमूद केले.
शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व मतदारांनी मतदान करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करत त्यांनी पुन्हा एकदा नारळ – नारळ – नारळ या चिन्हावर मतदान करण्याची नम्र विनंती केली आहे.


0 Comments