Advertisement

Breaking News
Loading...

मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांचे अपार्टमेंटवरून पडून निधन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर:

सोलापूर शहरातील प्रसिद्ध ‘मुलतानी बेकरी’चे मालक व उद्योजक सुनील मोतीलाल सदारंगानी यांचे गुरुवारी (५ फेब्रुवारी) दुपारी दुर्दैवी निधन झाले. विजयपूर रस्त्यावरील ‘पनाश’ अपार्टमेंट या बहुमजली इमारतीत ही घटना घडली असून, त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.



सदारंगानी (वय अंदाजे ५५ ते ६०) हे सोलापूरमधील परिचित उद्योजक होते. बेकरी व फ्लोअर मिल व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.



घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. सदारंगानी यांच्या अचानक निधनाने व्यापारी वर्गासह शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments