Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रुपमध्ये आज काँग्रेसची भव्य जाहीर सभा; उमेदवारांच्या प्रचारासाठी पदयात्रेसह शक्तिप्रदर्शन...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्ताकन डॉ. राजदत्त रासोलगीकर:

मंद्रुप जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सनाकौसर महमद शेख आणि अनंत जगन्नाथ म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी मंद्रुपमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंद्रुप येथील नेहरू चौक येथे आज सायंकाळी ५.०० वाजता ही जाहीर सभा होणार असून, त्यापूर्वी मंद्रूप बाजारपेठेतून उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेनंतर नेहरू चौकात सभा पार पडणार आहे.

या जाहीर सभेस काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, नूतन नगरसेवक तथा सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, समाजसेवक बाबा मिस्त्री, ज्येष्ठ नेते जाफरतज पाटील, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, युवक शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन आण्णा टेळे, अशोक निम्बर्गी, केशव इंगळे, चंद्रकांत ख्याडे, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, जगन्नाथ खरात, मोतीराम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास मंद्रुप परिसरातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वेळ : सायंकाळी ५.०० वाजता

ठिकाण : नेहरू चौक, मंद्रुप


Post a Comment

0 Comments