Advertisement

Breaking News
Loading...

“पैसे घ्या, पण मत शिवसेना–काँग्रेसलाच!” – उळे परिसरात झंजावाती प्रचार दौऱ्यात अमोल बापू शिंदेंचा भाजपवर थेट हल्ला...

 


उळे | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर:

बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेश सुभाष अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी उळे, उळेवाडी, बक्षी हिप्परगा आणि मुळेगाव येथे झंजावाती प्रचार दौरा काढण्यात आला. या दौऱ्याला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत परिसरात राजकीय वातावरण तापले.



या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, शिवसेना–काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितले की,

“शिवसेनेचे धनेश अचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांना निवडून द्या. खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या माध्यमातून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे हे देखील आपल्या गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीत.”



दरम्यान, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका करत प्रचारात आक्रमक भूमिका घेतली.



“भाजपकडून मतदारांना विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे. ते पैसे देत असतील तर घ्या, कारण ते तुमचेच हक्काचे आहेत. पण मतदान मात्र शिवसेनेचे धनेश अचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांनाच करा,” असे थेट आवाहन त्यांनी केले.



उळे, उळेवाडी, बक्षी हिप्परगा आणि मुळेगाव या सर्व गावांतून या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी घोषणा, कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांची उपस्थिती पाहता शिवसेना–काँग्रेस आघाडीचा प्रचार जोरात रंगताना दिसून आला.

Post a Comment

0 Comments