वळसंग | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्ताकन डॉ राजदत्त रासोलगीकर:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटातील उमेदवार धनेश सुभाष अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार आप्पा धनके यांच्यासह शिवसेनेच्या इतर अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज (बुधवारी) वळसंग येथील श्री शंकरलिंग हायस्कूलच्या पाठीमागील मैदानात दुपारी 3 वाजता प्रचारासाठी येत आहेत.
या दौऱ्यानिमित्त वळसंग येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. स्थानिक विकास, जनहिताचे प्रश्न तसेच आगामी काळातील धोरणे यावर ते आपली भूमिका मांडणार आहेत.
धनेश अचलारे आणि आप्पा धनके हे दोन्ही उमेदवार कार्यक्षम, लोकाभिमुख व विकासनिष्ठ म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच शिवसेनेच्या इतर उमेदवारांनाही या दौऱ्यामुळे मोठे बळ मिळणार आहे.
आजच्या या प्रचार सभेमुळे बोरामणी, कासेगाव व परिसरातील निवडणूक प्रचाराला वेग येणार असून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


0 Comments