Advertisement

Breaking News
Loading...

खुल्या राष्ट्रीय तायक्वान्दो स्पर्धेत मंद्रूपच्या खेळाडूंना २५ पदकांची घवघवीत कमाई...

 


पुणे | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

पुणे येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या खुल्या राष्ट्रीय तायक्वान्दो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमी, मंद्रूप येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २५ पदके पटकावली. या यशामध्ये ९ सुवर्ण, ८ रौप्य व ८ कांस्य पदकांचा समावेश आहे.



वडगाव शेरी (पुणे) येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन आर. बी. होरांगी अकॅडमी, पुणे यांनी केले होते. या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आदी राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.



दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमी, मंद्रूपच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजनगटांत सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

सुवर्णपदक विजेते :

अमन शेख, दिव्या पवार, अन्वी पवार, आरोही रणखांबे, आरोही कंदले, सफिना शेख, शुभम पवार, तनिष्का पवार व महेक शेख.

रौप्यपदक विजेते :

श्रेया पवार, श्रावणी नंदुरे, श्रावणी पवार, अभिजीत खरात, अर्थव शिंगडगाव, प्रतीक्षा देविदास, हर्ष सरवदे व समर्थ चव्हाण.

कांस्यपदक विजेते :

सुमया शेख, प्रेम चव्हाण, कार्तिक परांडे, श्रद्धा सोलापूरे, आयुब शेख, दीक्षा हेळकर, अबूबकर नदाफ व रविराज कुसुरे...

या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे तसेच रेश्मा राठोड, सचिन कुंभार, सिद्धाराम विजापुरे व प्रीती राठोड यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.




Post a Comment

0 Comments