Advertisement

Breaking News
Loading...

“थापा नव्हे, कामाची पोचपावती!” – नरखेड गटातून अपक्ष अनिल आबाजी पाटील यांचे मतदारांना भावनिक आवाहन...

 


नरखेड | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन:

नरखेड जिल्हा परिषद गट क्रमांक २४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अनिल आबाजी पाटील यांनी कामावर मत द्या असे थेट आणि ठाम आवाहन मतदार राजांना केले आहे. “मी फक्त थापा मारणारा कार्यकर्ता नाही, तर जनतेच्या अडचणींमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता आहे,” असे सांगत त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांची पोचपावती जनतेसमोर मांडली आहे.


दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या उभारणे, दुष्काळ पडताच पाणी वाटप करणे, शिरापूर–लांबोटी रस्ता स्वखर्चाने करणे, लोकमंगल ते शिरापूर रस्त्याचे काम स्वतःच्या खर्चातून पूर्ण करणे, शाळांमध्ये वह्या-पुस्तकांचे वाटप, जनावरांसाठी शिबिरे घेणे अशी अनेक लोकहिताची कामे आपण केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. या सर्व कामांचे फोटो आपल्या कडे उपलब्ध असून, ते मतदार राजांना कामाची पोचपावती म्हणून पाठवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



“निवडणुकीच्या वेळी घराघरात येणारे, पाय धरून मत मागणारे पुढारी पाच वर्षे कुठे असतात याचा शोध घ्यावा,” असे सांगत त्यांनी पक्ष बदलणाऱ्या राजकारणावरही टीका केली. “आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या मागे न लागता, मतदारांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे. जो काम करतो, त्यालाच मत द्यायचे – असे जनतेने ठरवले आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.


चांगले काम करणाऱ्यालाच नाव ठेवले जाते, मात्र सामान्य जनता कामाचे कौतुक करत असल्याचे सांगत, ७ तारखेला नरखेड जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार अनिल आबाजी पाटील यांच्या ‘नारळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला जिल्हा परिषदेत पाठवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी मतदार राजांना हात जोडून केली आहे.



काम बोलते, घोषणा नाही – अशा ठाम भूमिकेतून अनिल आबाजी पाटील यांनी नरखेड गटात आपली स्वतंत्र ओळख अधिक ठळक केली आहे.









Post a Comment

0 Comments