Advertisement

Breaking News
Loading...

भाजपच्या प्रचाराला वेग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आज सोलापुरात, मंद्रूप व कुंभारीत जाहीर सभा...

 


मंद्रूप / कुंभारी | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचाराला वेग आला असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे या आज मंगळवारी सोलापुरात दाखल होत आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप व कुंभारी येथे दोन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.



मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सोलापूर विमानतळावर मंत्री पंकजा मुंडे यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता मंद्रूप येथे पहिली जाहीर सभा, तर सायंकाळी ७.३० वाजता कुंभारी येथे दुसरी जाहीर सभा होणार आहे.

या दोन्ही जाहीर सभांचे नियोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, या सभांमधून भाजपचे उमेदवार, पक्षाची भूमिका व विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडण्यात येणार आहे. निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमुळे भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण या सभांमुळे अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



Post a Comment

0 Comments