Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपचे सत्ताधारी सुस्त; जनता निवडणुकीत धडा शिकवणार : मळसिद्ध मुगळे यांचे प्रतिपादन...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्ताकन डॉ राजदत्त रासोलगीकर:

मंद्रूपच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या काळात जनतेचा विश्वासघात केला असून विकासाच्या नावाने केवळ पोकळ आश्वासने दिली आहेत. गावाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणारे सत्ताधारी आता पूर्णतः अपयशी ठरले असून, येत्या निवडणुकीत मंद्रूपची जनता त्यांना निश्चितच जागा दाखवेल, असा घणाघात मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी केला.



मंद्रूपच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून सत्तेत येताच रखडलेली विकासकामे मार्गी लावून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार मळसिद्ध मुगळे तसेच मंद्रूप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. सोनाली कडते यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या होम टू होम प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपचे प्रशांत कडते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचारादरम्यान नागरिकांमधून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या निवडणुकीत बदल अटळ असून मंद्रूपमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास मळसिद्ध मुगळे यांनी व्यक्त केला.




Post a Comment

0 Comments