मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च तसेच दंगा काबू योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
ही कारवाई मंद्रूप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडली. रूट मार्चदरम्यान मंद्रूप परिसरातील प्रमुख रस्ते, चौक, संवेदनशील ठिकाणे तसेच वस्ती भागांतून पायी मार्च काढण्यात आला.
याच अनुषंगाने संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी दंगा काबू योजनेअंतर्गत सराव (ड्रील) घेण्यात आला. या सरावात बंदोबस्त व्यवस्था, दंगा नियंत्रण साधनांचा वापर तसेच तातडीच्या कारवाईबाबत पोलीस दलाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश निवडणूक काळात शांतता प्रस्थापित करणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे हा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
सदर रूट मार्च सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंद्रूप व परिसरात काढण्यात आला. तसेच सायंकाळी पाच वाजेनंतर भंडारकवठा, कंदलगाव व निम्बर्गी या गावांमध्येही रूट मार्च काढण्यात येणार आहे.



0 Comments