Advertisement

Breaking News
Loading...

खाकीतील ताकद देशपातळीवर झळकली..! सोलापूरचे पोलीस कर्मचारी भागवत शिंदे ‘भारत श्री’ मास्टर्स स्पर्धेत देशात पाचवे...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज :

सोलापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भागवत शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ४०+ वयोगटातील प्रतिष्ठेच्या ‘भारत श्री’ मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पोलीस खात्यातील जबाबदारीचे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत, धकाधकीच्या दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी या स्पर्धेसाठी कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि अफाट जिद्द दाखवली. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलातील कर्मचारी तसेच युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.

विशेष म्हणजे, भागवत शिंदे यांच्या सुकन्येनेही राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून चमकदार यश संपादन केले असून, शिंदे कुटुंबाच्या कर्तृत्वाचा ठसा देशपातळीवर उमटला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी भागवत शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि क्रीडाप्रेमींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



Post a Comment

0 Comments