होटगी | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर :
वळसंग जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले भाजपचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी यांनी आपल्या विजयानंतर मनोगत व्यक्त केले. भाजपने गेल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात राबवलेल्या विकासकामांमुळेच मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला आणि भाजपच्या अनेक उमेदवारांना भरघोस यश मिळवून दिले, असे ते म्हणाले.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपने सातत्याने प्रयत्न केले. या विकासकामांचा थेट लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचला असून, त्याच कामांची पोचपावती मतदारांनी निवडणुकीच्या माध्यमातून दिली आहे, असेही चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले.
मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. वळसंग गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


0 Comments