मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर :
मंद्रूप पंचायत समिती गणातील उमेदवार मळसिद्ध मुगळे आणि मंद्रूप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सोनाली प्रशांत कडते यांनी निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याने मंद्रूप परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
विजयानंतर मंद्रूपमध्ये दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत जंगी स्वागत केले. या विजयोत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी प्रशांत कडते हे स्वतः उपस्थित असून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत मंद्रूपच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. विजयानंतर संपूर्ण परिसरात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

0 Comments