Advertisement

Breaking News
Loading...

पदमशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी महापौर कै. जनार्दन कारमपूरी यांचे निधन; समाज, शहर व कामगार वर्गावर शोककळा...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी :

पदमशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष, सोलापूरचे माजी महापौर तथा शारदा मिलचे संस्थापक कै. जनार्दन कारमपूरी साहेब यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण समाज, शहर व कामगार वर्गाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

शरद पवार साहेबांशी अतूट निष्ठा राखत समाजकारण, राजकारण आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. माजी महापौर म्हणून शहराच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व सामाजिक न्यायासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

शारदा मिलच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार देत आर्थिक स्थैर्य आणि स्वाभिमान दिला. पदमशाली ज्ञाती संस्थेच्या माध्यमातून समाजएकता, शिक्षण, युवक मार्गदर्शन व गरजू घटकांसाठी मदतीचे कार्य त्यांनी सातत्याने केले.

स्पष्ट विचार, निर्भीड भूमिका, साधी राहणी आणि माणुसकीचा दृष्टिकोन हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांचे कार्य व विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

त्यांच्या निधनाबद्दल महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून शोकाकुल कुटुंबीयांना धीर देण्याची प्रार्थना करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments