हत्तूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर: तालुक्यातील ज़िल्हा परिषद/ पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या हत्तूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार मातोश्री लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांनी ८,९८३ मते मिळवत ३४ मतांनी थरारक विजय संपादन केला. या विजयानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, “मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने तालुक्याचा सर्वांगीण व वेगवान विकास साधला जाईल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी अमर पाटील यांनी सर्व मतदार, शिवसैनिक तसेच पाटील परिवारावर प्रेम व विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. “हा विजय जनतेच्या विश्वासाचा असून, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू,” असे त्यांनी नमूद केले.
विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तालुक्याच्या विकासासाठी नवीन उपक्रम व लोकाभिमुख निर्णय राबवण्याचा निर्धार नेतृत्वाने व्यक्त केला आहे.


0 Comments