दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या निर्णयानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ मंडळनिहाय आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूलविषयक दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करून प्रलंबित कामे निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.
शिबिरांचे वेळापत्रक (सकाळी १० ते सायं. ५)
दि. ७ मार्च २०२६ – बोरामणी मंडळ
स्थळ : जि.प. प्राथमिक शाळा, बोरामणी
दि. १४ मार्च २०२६ – होटगी मंडळ
स्थळ : जि.प. प्राथमिक शाळा, होटगी
दि. १० एप्रिल २०२६ – वळसंग मंडळ
स्थळ : श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, वळसंग
दि. १७ एप्रिल २०२६ – मुस्ती मंडळ
स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, मुस्ती
शिबिरात उपलब्ध प्रमुख सेवा:
प्रलंबित फेरफार निकाली काढणे...
७/१२ व ८अ उताऱ्यांतील दुरुस्ती व डिजिटल ७/१२ तत्काळ उपलब्ध...
उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमीलेअर इ. प्रमाणपत्रांचे वितरण...
भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण प्रकरणे...
तुकडेबंदी कायद्यावरील प्रकरणांचा आढावा...
शेतजमिनीच्या सहधारकांच्या हिस्सावाटणी मोहिम...
ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान व तक्रार निवारण सुविधा...
महत्त्वाच्या सुधारणा व जनजागृती:
अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी रद्द...
सनद प्रणाली संपुष्टात
एकवेळ अधिमूल्य भरण्याची सुलभ व्यवस्था...
डिजिटल ७/१२ उताऱ्यास कायदेशीर वैधता...
शिबिरांमध्ये ‘एक खिडकी प्रणाली’ राबवून तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना त्वरित सेवा देणार आहेत.
तहसीलदार किरण जमदाडे यांनी नागरिकांनी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


0 Comments