Advertisement

Breaking News
Loading...

१२ ऐवजी १६ फूट रस्ता; अंत्रोळीतील शेतकऱ्यांचे मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू... मंडळ अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; चौकशी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील रस्ता प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी आजपासून मंद्रूप अप्पर तहसील कार्याल्यासमोर उपोषण सुरू केले आहे. मंडळ अधिकारी विंचूर यांनी तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन करून १२ फूट ऐवजी १६ फूट रुंदीचा रस्ता तयार केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

तहसीलदारांनी गट क्रमांक १७/१ व १७/२ मधून पूर्व–पश्चिम १२ फूट रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता. मात्र, १९ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात १६ फूट रस्ता तयार करण्यात आल्याने ऊस पिक व बोअर पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा आरोप अर्जदार वर्षा नेताजी थोरात व इतरांनी केला आहे.

याशिवाय आदेशात नसताना दक्षिण–उत्तर दिशेचा रस्ता तयार करण्यात आल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. रस्ता मुरमीकरणासाठी वापरण्यात आलेल्या अंदाजे १५० ब्रास मुरुमाच्या रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावीत, पंचनामा प्रत्यक्ष ठिकाणी का करण्यात आला नाही, याबाबतही खुलासा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करावे व बेकायदेशीर रस्ता उखडून टाकावा, या मागण्यांसाठी आंदोलनकर्ते ठाम असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments