Advertisement

Breaking News
Loading...

दक्षिण तहसील कार्यालयात ‘वाचन संस्कृती’चा उपक्रम; तहसीलदार किरण जमदाडे यांची नवी संकल्पना...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर:

दक्षिण सोलापूर येथील तहसीलदार किरण जमदाडे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीचा विचार करत तहसील कार्यालयात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांच्या पुढाकारातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी लहानसे वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या केबिनसमोर त्यांच्या भेटीची वाट पाहत बसणाऱ्या नागरिकांचा वेळ उपयोगी जावा, या हेतूने येथे वृत्तपत्रे, विविध मासिके तसेच माहितीपर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतीक्षा करताना वाचनाचा लाभ मिळत आहे.

यापूर्वीही तहसीलदार जमदाडे यांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तहसील कार्यालय परिसरात पत्रा शेड उभारून बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे उन्हाळा किंवा पावसाळ्यात नागरिकांना थांबण्यासाठी योग्य सुविधा मिळू लागल्या आहेत.


नागरिकांच्या गरजा ओळखून त्यानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याची तहसीलदार जमदाडे यांची भूमिका पाहता ते संवेदनशील, अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या अडचणींची जाणीव ठेवणारे अधिकारी असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

तहसील कार्यालयात सुरू केलेल्या या वाचनालय उपक्रमामुळे प्रशासनाची लोकाभिमुखता अधोरेखित होत असून, नागरिकांमध्येही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.


Post a Comment

0 Comments