दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथे अडकून पडलेल्या दक्षिण सोलापूर तालुका तसेच सोलापूर शहरातील नागरिकांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे हे नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परत येऊ शकले.
परदेशात अडकलेल्या या नागरिकांच्या खाण्यापिण्याची व निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांना भारतात परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोयही करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदत केली.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाप्रमुख अमर अण्णा पाटील व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले. संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सुरक्षितपणे घरी परतू शकले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आपला हक्काचा माणूस उपमुख्यमंत्री पदावर असल्यामुळेच आमचे नागरिक सुरक्षित परत आले,” असेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले आहे.


0 Comments