Advertisement

Breaking News
Loading...

शाळेत विद्यार्थिनीला मारहाण; सोशल मीडियावर बदनामीची धमकी..! अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल; मंद्रूप पोलिसांकडून तपास सुरू...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण करून सोशल मीडियावर फोटो प्रसारित करत बदनाम करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात एका २३ वर्षीय तरुणाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता संबंधित विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत वर्गात बसली होती. त्यावेळी एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिच्याशी वाद घालत पाठीवर हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच, त्याच्याबद्दल कोणासमोर वाईट बोलल्याचा जाब विचारत सोशल मीडियावर फोटो टाकून बदनाम करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मंद्रूप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७८, ११५(२), ३५१(२), ३५१(३) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यावेळी आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.

संपादकीय टीप: अल्पवयीन मुलीची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तिचे नाव, गाव, शाळेचे नाव आणि ओळख पटवणारे इतर तपशील जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments