सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिवंगत पीएसआय केरु रामचंद्र जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने केरू रामचंद्र जाधव गौरव समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ७ वा. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 च्या समादेशक माननीय डॉक्टर दिपाली काळे मॅडम यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती गौरव समितीच्या अध्यक्ष सुमित्रा केरू जाधव यांनी दिली. यावर्षीच्या पुरस्कार वितरणामध्ये ज्येष्ठ विचारवंत तथा ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर ज्येष्ठ कामगार नेते अशोक जानराव यांना कामगार मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
दिवंगत पीएसआय केरु रामचंद्र जाधव
बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी योगदान देणाऱ्या सुचित्रा विठ्ठल थोरे यांना "आदर्श धम्मकार्य पुरस्कार "जाहीर झालेला आहे. सहकार क्षेत्रामध्ये तसेच समता सैनिक दल ,बौद्ध महासभा आणि धम्म चळवळीमध्ये योगदान देणारे रत्नदीप कांबळे यांना सहकार भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. धम्म चळवळीमध्ये, बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये भरीव योगदान देणारे नागसेन माने यांना "धम्ममित्र पुरस्कार" देण्यात येणार आहे .राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 च्या समादेशक दिपाली काळे मॅडम यांना "गुणवंत महिला पोलीस अधिकारी "पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे . पत्रकार म्हणून कर्तव्य बजावताना तळागाळातील लोकांना न्याय देणारे दै. दिव्य मराठीचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांना " गुणवंत पत्रकार पुरस्कार" जाहीर झाला आहे.तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव असे योगदान देणाऱ्या राष्ट्रसंत शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे यांना "गुणवंत शिक्षिका" पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, वृक्षाचे रोपटे असे आहे.सत्कार मूर्तीचा कुटुंबीयसह सत्कार करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरणासाठी भदंत सुमेधजी नागसेन महाथेरो, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक दहाच्या समादेशक डॉ. दिपाली काळे मॅडम त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील फुले आंबेडकरी चळवळ तसेच बौद्ध धम्म चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे. या पुरस्कारावर वितरणानंतर समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित धम्म संस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पीएसआय केरु रामचंद्र जाधव गौरव समितीच्या अध्यक्ष सुमित्रा केरु जाधव, समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, समता सैनिक दलाचे जिओसी शांतीकुमार कांबळे, चंदकांत कोळेकर,विनोद जाधव यांनी केले आहे.



0 Comments