यावेळी राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका प्रांजली मोहीकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, "दिवाळीचा खरा प्रकाश पणत्यांमध्ये नसतो, तर तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या आनंदात असतो." फराळासोबतच आपुलकी, माणुसकी आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आधार प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. जवाहर मोरे यांनी स्थलांतरित ऊसतोड मजूर कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आधार देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. तसेच उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास बसवनगरचे सरपंच निखिल राठोड, माजी सरपंच आनंदा देशमुख, माजी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, कारखान्याचे शेतकी अधिकारी राजाराम पवार आणि ऊस पुरवठा अधिकारी बसवराज निंगफोडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या अनुराधा निकम, नीलिमा, अविराज गोण्याल, पल्लवी अणवेकर, भारती ढोबळे, रणजीत पवार, अमोल गोतसुरे, सागर पुकाळे, चंचला खरात, आनंद खरात, सुहास भोसले, यतीन गंभीर, विनया जक्कन, पंकज साठे, महेश महिंद्रकर, बोराडे तसेच आधार प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र कांबळे, अध्यक्ष शंकर नळे, उपाध्यक्ष रजनीकांत कुरनुरकर, दिनेश कुलकर्णी, ज्योती कांबळे, जयश्री मराठे, आशा चव्हाण, मंजुषा फुलारी, रोहिणी नळे, सुनिता कोरे, सत्यजित भालेराव, सुरेश डफळे, शिवानंद घंटे, राजकुमार कोरे, गौरव कांबळे व श्रेयस बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.




0 Comments