Advertisement

Breaking News
Loading...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एम. के. फाउंडेशनचा माणुसकीचा दीपोत्सव; बहुरूपी नगरमध्ये गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर सण साजरा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा आणि गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून एम. के. फाउंडेशनच्या वतीने बहुरूपी नगर, विजापूर रोड येथे गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले.

एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बहुरूपी नगरमधील मल्लेश सूर्यवंशी, बसवराज सितारे, सुभाष सितारे, कल्लाप्पा तेले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. तसेच एम. के. फाउंडेशन परिवाराचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात थोडा आधार मिळावा, त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, या उद्देशाने फाउंडेशनच्या वतीने शिधा किट तयार करण्यात आले होते. गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवताना त्यांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा विचार करण्यात आला.

यावेळी बोलताना महादेव कोगनुरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याची भावना व्यक्त केली. केवळ सणाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा गरजूंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.


दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्याच्या घरातही आनंदाचा दिवा पेटवण्यात आहे, या भावनेतून एम. के. फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे बहुरूपी नगरमधील गरजू कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा गोडवा निर्माण झाला.


Post a Comment

0 Comments