Advertisement

Breaking News
Loading...

राष्ट्रीय एकता परेडमध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांचा डंका! ४ अंमलदारांचा राष्ट्रीय परेडमध्ये सहभाग...

 

सोलापूर, दि. ३ नोव्हेंबर —
भारत सरकारतर्फे देशभरात ३१ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, केवडिया येथे भव्य ‘राष्ट्रीय एकता परेड’ आयोजित करण्यात आली होती.

या परेडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या पथकाने उल्लेखनीय सहभाग नोंदविला असून, या पथकात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील चार अंमलदारांची निवड झाली होती.

महाराष्ट्र पोलीस दलाचे पथक पोलीस उपअधीक्षक सौ. सविता मारुती गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अंमलदारांनी सहभाग नोंदविला —



1. श्री. अतुल गुंडाप्पा सुरवसे, पोलीस हवालदार


2. श्री. प्रशांत कर्णेश्वर जाधव, पोलीस हवालदार


3. श्री. सागर सुधीर हळदे, पोलीस कॉन्स्टेबल


4. श्री. स्वप्निल रेवणसिद्ध सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल



या सर्व अंमलदारांनी ५० दिवस केवडिया (गुजरात) येथे सराव करून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या प्रत्यक्ष परेडमध्ये यशस्वीरीत्या सहभाग घेतला.

परेडनंतर हे सर्व अंमलदार सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात परतल्यावर पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

राष्ट्रीय एकता परेडसाठी या अंमलदारांना मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. शिरीष हुंबे, उपअधीक्षक (मुख्यालय) आणि मा. श्री. बालाजी पोवार, राखीव पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments