Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये अवैध वाळू उपशाविरोधात बहुजन हक्क अभियानचे बेमुदत धरणे आंदोलन; प्रशासनाला दिला इशारा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी आरिफ नदाफ | मंद्रूप परिसरातील कथित अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि महसूल प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद (मास्तर) बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला.

या आंदोलनात श्री मोहन थळंगे (शहर जिल्हा कार्याध्यक्ष), सचिन फडतरे (दक्षिण तालुका अध्यक्ष), अफजल शेख (अल्पसंख्याक जिल्हा सचिव), हबीब शेख (शहर कार्याध्यक्ष), कीर्तीपाल घोडकुबे (शहराध्यक्ष), राज कोळी (दक्षिण तालुका अध्यक्ष), अनिल टेळे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी अवैध वाळू उपसा त्वरित बंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला दिला.



Post a Comment

0 Comments