Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..! खडी क्रेशर उद्योगक्षेत्रात भरारी घेतलेले उद्योजक - अरुण (दादा) चौगुले यांना वाढदिवसानिमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा..!

 


🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!

खडी क्रेशर उद्योगक्षेत्रात भरारी घेतलेले उद्योजक - अरुण (दादा) चौगुले यांना वाढदिवसानिमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा..!

गरज ही शोधाची जननी असते, असे म्हणतात. कायम आर्थिक परिस्थितीशी दोन हात करीत आणि कोणतेही व्यवसायिक शिक्षण न घेतलेले सोलापुरातील मड्डीवस्ती येथील उद्योजक अरुण (दादा) चौगुले यांनी खडी क्रेशर उद्योगात घेतलेली भरारी नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत धैर्य, जिद्द, चिकाटी, योग्य नियोजन करून 'सुवर्णा स्टोन क्रेशर' या नावाने खडी क्रेशर व्यवसाय अरुणदादांनी उभा केला आहे. दादांनी कमी वयात या उद्योगातून उंच भरारी घेतली आहे. त्यांना त्यांचे पुतणे कै. अनिल चौगुले यांची मोलाची साथ मिळाली. आजही सोलापूर शहरासह इतर तालुक्यात खडी, दगड ची मोठी मागणी आहे. व्यवसायाप्रती असलेली निष्ठा प्रामाणिकपणा, माणसाचे उभे केलेले जाळे हे दादांच्या यशाचे खरे गमक आहे. व्यवसाय सुरू करताना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी सुरुवातीला बँकेचे कर्ज घेतले. हलाखीची परिस्थिती बदलायची असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. हे विचारात घेऊन व्यवसाय वृद्धी करण्यास सुरुवात केली. गुणवत्तापूर्ण माल बनवत गेले. त्यासोबत असंख्य ग्राहक जोडत गेले. 

ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचे ऋण पूर्ण करण्यासाठी श्री रुपा भवानी खाण मोटार मालक संघटनेच्या सदस्यपदावरून दादांनी भरीव अशी आर्थिक मदत समाजाला दिली आहे. यामध्ये वडार समाज सामुदायिक विवाह सोहळा, 51 फुटी हनुमान गड, हनुमान जयंती यासारख्या असंख्य उपक्रमाचा समावेश होतो. या पुढील काळातही आपल्या हातून सामाजिक उपक्रमात भरीव आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपणास आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो! अशी हनुमान गड चरणी सदिच्छा..!


                  - रवि देवकर 

Post a Comment

0 Comments