Advertisement

Breaking News
Loading...

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती बुद्धजय भालशंकर यांनी दिली आहे.

ही स्पर्धा चार गटांमध्ये विभागण्यात आली असून बाल गट (वय ६ ते १० वर्षे), शालेय लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी), शालेय मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी) आणि खुला गट अशा गटांचा समावेश आहे.बाल गटातील स्पर्धकांना शाहू महाराजांचे दिलेले चित्र रंगवायचे आहे. शालेय लहान गटातील स्पर्धकांनी आपल्या आवडीचे शाहू महाराजांचे चित्र काढून रंगवायचे आहे. शालेय मोठ्या गटासाठी शाहू महाराजांच्या जीवनावरील कोणत्याही प्रसंगावर आधारित चित्र काढण्याचा विषय देण्यात आला आहे. खुल्या गटातील स्पर्धकांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे चित्र साकारायचे आहे.स्पर्धा पुढील ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे : १) विश्वभूषण विद्यालय, अभिषेक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर

२) सोलापूर महानगरपालिका शाळा क्र. २८, सुंदरम नगर, विजापूर रोड, सोलापूर

३) नालंदा बुद्ध विहार, नालंदा नगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजापूर रोड, सोलापूर

४) संचमित्रा माध्यमिक विद्यालय, आवताडे वसाहत, कुर्डुवाडी, ता. माढा

५) मातोश्री माध्यमिक विद्यालय, म्हैसगाव, ता. माढा

स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून नावनोंदणी अनिवार्य आहे. 

  नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी बुद्धजय भालशंकर मो.९९६०३७२७३६ आशुतोष तोंडसे मो. ७०३८८८३३३९ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर शहर व परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच कला रसिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments