वळसंग | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर |अक्कलकोट–सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील लिंबिचिंचोली ब्रिजजवळ आज सकाळी बोलेरो आणि आयशर वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंभीर जखमी झालेले दोघेही अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील पंचनामा व तपासाची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नेमकी कारणे अद्याप समोर आलेली नसून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.
👉 अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा.
#BreakingNews #Akkalkot #SolapurRoad #RoadAccident #LimbichincholiBridge



0 Comments