Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये दत्त जयंती उत्सवाचा दिव्य सोहळा; पादुका आगमनापासून मिरवणुकीपर्यंत चार दिवस भक्तिमय वातावरण...

 



मंद्रूप (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी): दत्त जयंतीनिमित्त मंद्रूप येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. चार दिवस गावात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.



या कालावधीत दररोज जय हनुमान भजनी मंडळ मंद्रूप, कंदलगाव, मनगोळी व अंतरूळी येथील मंडळांनी सादर केलेल्या भजनसंगीताने भक्त भाविक मंत्रमुग्ध झाले.

३ डिसेंबर रोजी गाणगापूर येथून पादुकांचे अभिषेक करून त्यांना मंद्रूपमध्ये आणण्यात आले. त्यानंतर ४ डिसेंबरच्या पहाटे दत्त मूर्ती व गाणगापूर पादुकांचा महाअभिषेक भक्तिभावाने संपन्न झाला.



दुपारी १२ वाजता मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या हस्ते महापूजा व आरतीचे आयोजन झाले. त्यानंतर पाळणा कार्यक्रमाला सुरुवात झाली असून महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी दत्त मूर्तीची हत्तीवरून सवाद्य भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. रात्री ८ वाजता मंद्रूप पोलीस ठाणे येथे पालखी पूजन आणि महाप्रसादाने दत्त जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments