सोलापूर शहर (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी): – सोलापूर शहरात तृतीयपंथीय समाजाला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. प्रेमप्रकरणात झालेल्या फसवणुकीच्या मानसिक धक्क्यामुळे एका तृतीयपंथीय युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत तृतीयपंथीयाचे नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी (वय २२, रा. साईनगर, बाळे) असे आहे.
प्रेमात फसवणूक आणि अंतिम निर्णय…
प्राथमिक तपासानुसार, प्रकाश एका तरुणासोबत प्रेमसंबंधात होता. दोघांमध्ये नियमित संपर्क असला तरी काही दिवसांपासून त्या तरुणाने प्रकाशापासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती. त्यातच अचानक त्या तरुणाने दुसरीकडे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. या घटनेने प्रकाश मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता.
प्रियकराचा विवाह होण्याच्या आदल्या दिवशी, रविवारी प्रकाशने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीय समाजाची मोठी गर्दी:
घटनेची वार्ता कळताच सोलापूरातील तृतीयपंथीय समाजातील मोठ्या संख्येने सदस्य सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. समाजनेत्यांनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मृत्यूपूर्वी बनवला व्हिडिओ:
प्रकाशने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी तो जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर पोलीस करत आहेत.



0 Comments