नरखेड / मोहोळ तालुका हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: नरखेड जिल्हा परिषद गटातून शिरापूर (सो) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी येणारी जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कामात सक्रिय असलेले अनिल पाटील यांनी सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद ठेवत विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे.
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, युवक व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे” या भूमिकेतून त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे.
या पार्श्वभूमीवर नरखेड गटातील सर्व नागरिकांनी मला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी, अशी नम्र विनंती अनिल आबाजी पाटील यांनी केली आहे. जनतेच्या विश्वासावर खरे उतरून सर्वसमावेशक विकास साधण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

0 Comments