Advertisement

Breaking News
Loading...

मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; सोलापूर ग्रामीण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई...

 


सोलापूर ग्रामीण: हॅलो रिपोर्टर न्यूज: 

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल वी. कुलकर्णी यांनी दिले होते. त्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत अवैध हातभट्टी निर्मितीचे ठिकाण उद्ध्वस्त केले.


मा. श्री. राहुल अत्राम (भा.पो.से.), परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी मौजे मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा गुळमिश्रीत रसायनयुक्त कच्चा माल, लोखंडी पिंपांच्या भट्ट्या तसेच इतर साहित्य असा एकूण ₹ 30,96,000/- किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदर मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.


या प्रकरणी अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याप्रकरणी 04 सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर व प्रभावी कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.


या यशस्वी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

सदर कारवाई ही मा. श्री. अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्रीमती भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभाग, मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


प्रत्यक्ष कामगिरीत सहभागी अधिकारी व कर्मचारी –

मा. श्री. राहुल अत्राम (भा.पो.से.), परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक श्री. विजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक ग्रे. पो. सई श्रीकांत गायकवाड, सपोफौ प्रकाश कारटकर, पो.हे.कॉ. विजय भरले, पो.हे.कॉ. रवि माने, पो.हे.कॉ. धनराज गायकवाड, पो.कॉ. सुरज रामगुडे, पो.कॉ. मनोज राठोड, पो.कॉ. यश देवकते, पो.कॉ. समर्थ गाजरे, पो.कॉ. योगेश जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर पथक


तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर येथील –

निरीक्षक श्री. घाडगे, निरीक्षक श्री. चौरे, निरीक्षक श्री. पाटील, श्री. सिध, श्री. शेळके व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या उल्लेखनीय कामगिरी केली.


Post a Comment

0 Comments