सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज :
बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रभाग क्र. २३ क मधून सर्वसाधारण महिला गटासाठी सौ. सुगंधा (ताई) कपिल कोळी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी, अन्यायाविरोधात आणि परिवर्तनाच्या लढ्यासाठी त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
सामाजिक बांधिलकी, तळागाळातील प्रश्नांची जाण आणि सामान्य माणसाशी असलेला थेट संवाद ही त्यांची ओळख आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार व शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी ठोस काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
“बदल घडवूया, परिवर्तन करूया” या संदेशासह नागरिकांनी परिवर्तनासाठी मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.



0 Comments