Advertisement

Breaking News
Loading...

बेडर पूल येथे पैशाच्या वादातून धमकी व शिवीगाळ; तिघांविरोधात सदर बझार पोलिसात एनसीआर दाखल...


सोलापूर शहर| हॅलो रिपोर्टर न्यूज: 

पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोलापूर शहरातील सदर बाजार परिसरात घडला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात शीतल कजाकवाले, विनय बाबावाले आणि विनायक बाबावाले ( सर्वजण रा. नवीन तालीम बेडर पूल ) या तिघांविरोधात असंज्ञेय गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.



फिर्यादी विशाल किसन बिरबानवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सदर बाजार परिसरात पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. या वादात संशयितांनी फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2) व 3(5) अन्वये एनसीआर क्रमांक 0055/2026 नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा असंज्ञेय स्वरूपाचा असल्याने फिर्यादीस संबंधित न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



या घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव विठ्ठल बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर एन मनोहर हे करीत आहेत.




Post a Comment

0 Comments