Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपला पहिल्यांदाच पोलिस निरीक्षक; सोलापूर ग्रामीणमध्ये सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या...

 


सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोर्टर न्यूज|मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रशासकीय सोयीसाठी सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विशेष म्हणजे मंद्रूप पोलिस ठाण्याचा पदभार पहिल्यांदाच पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.

मंद्रूप पोलिस ठाण्याची धुरा मंदिर सुरक्षा विभागातील शंकर पटवारी यांच्याकडे देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मंद्रूप पोलिस ठाण्याचे प्रशासकीय बळ वाढणार असल्याची चर्चा आहे.

मोहोळ पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीण येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी ग्रामीण पोलिसांच्या मानव संसाधन शाखेचे बाजीराव पोवार यांच्याकडे मोहोळ पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कामती पोलिस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर उदार यांचीही बदली पुणे ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सहायक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंद्रूप पोलिस ठाण्याचा पदभार पहिल्यांदाच पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला असून मंदिर सुरक्षा विभागातील शंकर पटवारी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडे वेळापूर पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्याकडे नातेपुते पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच करमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्याकडे माढा पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

वेळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे.

बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सध्याचा कार्यभार तात्काळ सोडून नव्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

या बदल्यांमुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दलात नव्या कार्यपद्धतीची सुरुवात होणार असल्याची चर्चा सुरू आहे.



Post a Comment

0 Comments