मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंद्रुप येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात पार पडला. सोलापूर जिल्हा समाज सेवा मंडळ संचलित या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत निरोपाचा सोहळा रंगला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. श्री. कोळी एस. एल. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदीप महादेव कमळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक श्री. राजकुमार तेली सर यांनी करत विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील प्रवासाचे भावस्पर्शी चित्र उभे केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण सांगत शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सौ. अश्विनी कोळी मॅडम, श्री. प्रकाश पाटील सर आणि श्री. मुनीर अहमद शेख सर यांनी आगामी परीक्षांसाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ. कमळे यांनी अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कोळी सरांनी “कठोर परिश्रम आणि शिस्त” हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे अधोरेखित केले.
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला स्नेहभेट देऊन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या माळी, पूजा केवटे व महेक लिगेवान यांनी केले, तर आभार कु. स्वराली केवटे हिने मानले.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



0 Comments