बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्ताकन डॉ राजदत्त रासोलगीकर:
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धनेशजी आचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ मौजे कासेगाव व वडजी येथे भव्य कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना, युवासेना, कामगार सेना यांचे पदाधिकारी, शिवसैनिक, असंख्य माता-भगिनी तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी मार्गदर्शन करताना अमोल बापू शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “लाडकी बहीण योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केली. मात्र आज काही जण या योजनेचे श्रेय लाटून जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेला आता सत्य समजले आहे, त्यामुळेच विरोधक या शिवसेना जोडीसमोर हतबल झाले आहेत.”
पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “बोरामणी गटाच्या आणि कासेगाव गणांच्या सर्वांगीण विकासासाठी धनेशजी आचलारे आणि अप्पा धनके यांना भारघोस मतदान करून विजयी करा. शिवसेना ही केवळ आश्वासन देणारी नाही, तर काम करणारी शक्ती आहे.”
या कॉर्नर बैठकीत उपस्थितांनी ‘धनुष्यबाण’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांचा जोश पाहता बोरामणी गटात शिवसेनेची लाट स्पष्टपणे दिसून आली.
एकूणच कासेगाव व वडजीतील या प्रचार सभेने शिवसेना उमेदवार धनेशजी आचलारे आणि काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांच्या विजयाचा आत्मविश्वास अधिकच बळावला असल्याचे चित्र दिसून आले.



0 Comments