सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याने विशेष मोहिम राबवत CEIR पोर्टलच्या माध्यमातून गहाळ व चोरीस गेलेल्या तब्बल ५३ अँड्रॉईड मोबाईल हँडसेटचा यशस्वी शोध लावला आहे. एकूण सुमारे ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत सुपूर्द करण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाला गती दिली.
पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांच्या नेतृत्वाखाली CEIR पोर्टल टीमने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे मागोवा घेतला. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या सहाय्याने मोबाईलचे IMEI क्रमांक ट्रॅक करून विविध कंपनींचे ५३ मोबाईल हस्तगत करण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते संबंधित मूळ खरेदीदारांना सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सोलापूर ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले आहे.
कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचारी :
मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे
पोशि/ जाधव (CEIR पोर्टल कामकाज)
सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवत तांत्रिक कौशल्याच्या जोरावर सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.



0 Comments