Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई... सोलार प्लांटमधील वायर चोरी प्रकरणी सिक्युरिटी गार्डसह दोघे जेरबंद...

 


सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलार प्लांटमधील वायर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत सिक्युरिटी गार्डसह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वळसंग पोलीस ठाणे येथे नोंद असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सोलार प्लांटमधील सोलार प्लेट व वायर चोरीच्या घटनांचा आढावा घेऊन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाला गती दिली.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक अक्कलकोट उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सागर माळी व अनिल माळी (दोघे रा. लिंबिचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी आचेगाव येथील टाटा पावर सोलार प्लांटमधून वायर चोरी करून ती जाळून तांबे विक्रीसाठी ग्राहक शोधत आहेत.

पथकाने तत्काळ कारवाई करत कुंभारी पुलाखाली दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान

१) सागर गेनसिद्ध माळी (वय २८, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड)

२) अनिल प्रभाकर माळी (वय २८, व्यवसाय – शेती)

यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये आचेगाव येथील टाटा पावर सोलार प्लांटमधून वायर चोरी करून ती जाळून तांबे काढल्याची कबुली दिली. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाणे येथे गु.र. नं. ५५३/२०२५, बीएनएस २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद आहे.

दोन्ही आरोपींकडून १८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास वळसंग पोलीस ठाणे करीत आहे.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी:

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :

सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, पोहेकॉ सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोकाॅ सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, चापोकाॅ दिलीप

सोलार प्लांट चोरी प्रकरणाचा छडा लावून स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, या कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments