Advertisement

Breaking News
Loading...

सीसीटीव्हीच्या धाग्यावरून घरफोडीचा पर्दाफाश; ₹ १३.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त, विजापूर नाका पोलिसांची दमदार कामगिरी...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीप्रकरणी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत तब्बल १३ लाख ९४ हजार ०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे पोकॉ/ अमृत सुरवसे यांनी बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक माहितीच्या आधारे पारशी विहीर, सोलापूर येथे सापळा रचून आरोपी अंकित ऊर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी (वय ३४, व्यवसाय चालक, रा. घर नं. ८५, जुना बाजार खडकी, पुणे, सध्या रा. प्लॉट नं. ५२, अंबिका नगर, पारशी विहीर, सोलापूर) यास अटक करण्यात आली. त्याच्यासोबत असलेला एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आला आहे.

या आरोपींकडून विजापूर नाका पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

जप्त मुद्देमालात सोन्याच्या दागिन्यांचा समावेश:

आरोपींकडून विविध प्रकारचे सोन्याचे हार, नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, कानातील रिंग, कर्णफुले, टॉप्स, मोरणी, सोन्याचे कॉईन तसेच डायमंड व मोती जडित दागिने असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अंदाजे ६३.०७० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार (३,७८,००० रु.), ५०.९७० ग्रॅमचा नेकलेस (३,०५,८२० रु.), बांगड्या, विविध अंगठ्या, कानातील दागिने आदींचा समावेश आहे.

तसेच आरोपीकडून ९०,००० रुपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा S23 अल्ट्रा मॉडेल मोबाईल (IMEI नं. ३५३८३५८८१४४५६४९ व ३५३९०१६५१४४५६४७) जप्त करण्यात आला आहे.

एकूण १३,९४,०८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) श्री. विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त विभाग-२ श्री. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दादा गायकवाड, पोनि/ सुशांत वराळे (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सफौ/ आप्पा पवार, पोह/ सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, पोकॉ/ समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगाव, स्वप्नील जाधव तसेच पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) कार्यालयाकडील पोह/ अयाज बागलकोटे व पोशि/ अर्जुन गायकवाड यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

घरफोडीप्रकरणी आरोपींना अटक करून मोठा ऐवज हस्तगत केल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून विजापूर नाका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments